ज्योतिबाच्या नावानं चांगभलं
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं
चांगभलं रं देवा चांगभलं ज्योतिबाच्या नावानं चांगभलं
उधळ गुलाबी गुलाल
माझा ज्योतिबाच्या नावानं र
चांगभलं रं देवा चांगभलं ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ।।
तू शिवशंकर केदारेश्वर
भोळा भाभळा तुच परमेश्वर
दैत्यांचा संंहार करणार, माझा तू देवा र
चांगभलं रं देवा चांगभलं ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ।।
अंबाआईने तप केल्यावर, प्रकट झाले रूप
भक्त जन सारी येतीया, गोडी लागली तुझी खूप
रत्नासुराचा वधातूने केला, माझा तू देवा रं ।।
चांगभलं रं देवा चांगभलं ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ।।