STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

जय महाराष्ट्र..

जय महाराष्ट्र..

1 min
263

जय जय महाराष्ट्र !

ही करु आम्ही गर्जना,

कोटी कोटी वंदन हे

मायभूच्या चरणा..


पावनभूमी ही महाराष्ट्राची

महाराष्ट्र माझा महान,

संतमहंतांची भूमी खरी

संस्कारांची ही खाण.


शूर शिवबांचा पराक्रम

या मातीने पाहीला,

सह्याद्रीचा कडा गर्जतो

नमन महाराष्ट्र भूला.


संस्कृतीचा महान महीमा

महान असे संतवाणी,

गडकिल्ले साक्षी देती

हृदयी कोरली लेणी .


क्रूष्णा, गोदावरी, भिमा

करीती सुजलाम, सुफलाम,

मळे पिकती सोन्याचे

मातीत गाळूनी घाम.


कोकण सजला,नटला

मुंबई राजधानी छान,

माझा महाराष्ट्र महान

मज वाटे अभिमान.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational