STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

3  

Meenakshi Kilawat

Romance

जरतारी

जरतारी

1 min
390

किणार साडीची 

मयुर पंखाची

राया बसा की माझ्या शेजारी

पैठणी घातली जरतारी  !!धृ!!


तुमच्यासाठी सजले

शालू मी नेसले

तुमच्या प्रेमा रंगले

मनी मी लाजले

विनली रेशमाच्या धाग्यांने  

पैठणी घातली जरतारी  !!१!!   


प्रितीचा केला शृंगार

नटले साचार

दरवळला अत्तर 

भावला गांधार 

वेलबुट्टीने भरली नक्षी

पैठणी घातली जरतारी  !!२!!



સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Romance