STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

4  

Manisha Wandhare

Romance

जोडीदार माझा तू

जोडीदार माझा तू

1 min
296

अश्या पावसळी चिंब बहरूनी आली ,

सांज तु ,माझ्या स्वप्नात न्हाली ,

रंग जराशी सोडून गेली ,

त्यावरी, पावलांची माझ्या ठसे उमटली ,

जन्मजन्मांतरीची साथ तुला मागीतली ,

हृदयाने माझ्या हाक तुलाच दिली ...

जोडीदार माझी तु ,

निवड तुझीच केली ...

हृदयाने माझ्या हाक तुलाच दिली ...

धूंद चाफ्या कळ्यांना प्रित लाजवूनी गेली,

शुभ्र चांदणी जराशी ढगाआड गेली,

कोरीव कोर तेथेच लपून बसली ,

अशी लावण्या तु , ना त्यांनी पाहली ,

निज निज रात्री, तुला का? जाग आली ...

हात हातात घ्यावा ,ओढ तुझी मनी लागली ...

हृदयाने माझ्या हाक तुलाच दिली ...

जोडीदार माझी तु ,

निवड तुझीच केली ...

हृदयाने माझ्या हाक तुलाच दिली ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance