STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Tragedy

2  

Meenakshi Kilawat

Tragedy

जो थांबला

जो थांबला

1 min
232

जो थांबला जगी तो नुसताच भार आहे

त्याच्याच भावनांचा लहरी प्रचार आहे....!!


आम्हीच मांडल्या या सरणावरी शलाका 

सांंगायचे धगीच्या ज्वालाच फार आहे....!!


उघडून अंतरंगी भिनली अशी विरक्ती

ओशाळ जीवनाच्या व्यासात भार आहे....!!


स्वार्थात धुंद खुळले, नाही कुणी कुणाचा  

शुभकामनेस झाले, पाठीत वार आहे....!!


ना काल मज सुखाचा येथे कधी मिळाला

डोळ्यात आसवांची दररोज धार आहे....!!


ज्यांनी खुशाल केले रक्तपात काल येथे

त्यांचाच रूतबा हा शहरात फार आहे...!!


 धर्मराज राजयोगी दानविर साहसी तो

दुनियेत त्याग करुनी देवात सार आहे....!!


सुरुवात पावसाची झाली बघा नव्याने 

पल्लवीत आस भरली जगण्या तयार आहे....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy