STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Action Children

2  

MEENAKSHEE P NAGRALE

Action Children

जंतनाशक मोहीम

जंतनाशक मोहीम

1 min
178

२१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर

जंतनाशक मोहीम सप्ताह

आपले आरोग्य सुदृढ ठेवू या

मिटेल कृमीपासूनचा दाह....!!


अंगणवाडी ते सर्व शाळेत

साजरा करू या जंतनाशकदिन

भारताची भावी पिढी सुदृढ

होऊन नाही राहणार कोणी थीन...!!


आपले आरोग्य आपल्या हाती

चला ध्यानात एवढे ठेवू या

वर्षातून दोन वेळा गोळ्या घेऊ

रक्तक्षय, अशक्तपणा, कुपोषण हटवू या...!!


बालकांचा बौद्धिक, शारीरिक विकास

आहे अति महत्त्वाचा

त्यासाठी १ ते १९ वर्ष वयोगटातील

मुलांनी निर्धार करा कृमी मुक्त होण्याचा..!!


मोफत गोळ्या मिळतात सर्वांना

लवकर खायची एक गोळी चघळून

नाही होणार काही दुष्परिणाम

साऱ्या आजारासह कृमी जातील पळून...!!


२२ फेब्रुवारीला जंतनाशक मोहिम

वर्षातून असतात दोन वेळा

सुदृढ ठेवा शरीर तुमचे आणि

मुलांनो नाचा,गा,हसा,खेळा....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action