STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

जनी मनी बुद्ध नाम

जनी मनी बुद्ध नाम

1 min
299

बुद्ध ज्ञानाची उपाधी 

ज्ञानी आकाशा एवढा, 

करे उद्धार जगाचा 

गाऊ गौतमी पोवाडा!!!!!१ 


चित्र वास्तव पाहिले 

मृत्यु वेदना जाणले, 

सुन्न होऊन सिद्धार्थ 

सत्य अटळ पाहिले!!!!!२


सर्वसंग परित्याग 

फिरे ज्ञानाच्या शोधात,

मार्ग ध्यानाचा पत्कारी 

बोधी वृक्षाच्या छायेत!!!!!३


धम्मचक्रप्रवर्तन 

दुःख निवारण मार्ग,

धर्म मानवतावादी 

सदाचार हाच मार्ग!!!!!४


देई शांतीचा संदेश 

करे प्रसार विश्वात,

दृष्ट प्रवृत्ती पासून 

अलग ठेवून चित्त!!!!!५


युद्ध करे सारे नाश 

भंग सारी शांती प्रेम, 

युद्ध नको बुद्ध हवे 

जनी मनी बुद्ध नाम!!!!!६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational