STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Others

4  

Rohit Khamkar

Abstract Others

जिवंत

जिवंत

1 min
231

धावण्याच्या घाईत, नेमकं चालायलाच विसरलोय.

प्रगतीच्या या जिवनात, मूक्याणे बोलायला शिकलोय.


मोठेपणा दाखवायच्या नादात, खुप काही विकतोय.

हरलो कितीही तरीही, दाखवतोय की जिंकतोय.


काय खोटं अनं काय खरं, ज्याच त्याला माहीत.

सगळे हाछ्छे संपले, मग मागं कोनी राहत नाहीत.


चौघांचिं सोबत शेवट, जयजयकार तिरडीचा.

संपणारा तो रुबाब, आता शेवटचा मिरवायचा.


घालतील दिवस काढतील वेळ, नाव तुमचं पुसण्या.

किंमत काही कळली नाही, तुम्हा जिवंत असण्या.


आयुष्याच्या नंतर नाही, सगळी आहे आधीच खंत.

जगण्याच्या इतिहासात, कोणाचं नाव नाही जिवंत.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract