STORYMIRROR

Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

जीवनगाणे गातच रहावे..!

जीवनगाणे गातच रहावे..!

1 min
177

जीवनगाणे गातच रहावे...!

जीवनगाणे गाताना

देवांनी काय केलं...?

हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे

उत्तराची यादीच जणू

न संपण्यासारखी आहे

जन्मापासून सुरू होणारा प्रवास

पार अंतापर्यंत चालू असतो

तरीही आपण संपण्याची

वाट पहातच तो करत असतो

आजची गोष्ट आज अनुभवताना

उद्याचे भान उरत नाही

कालच्या दिवसाचे मोल

कारण उद्याच्या दिवसावर ठरत नाही

उद्याचा दिवस कधीच आपला नसतो

तरीही जीव कासावीस होतो

आणि मग कळत देवान काय केलं

तर उद्याच्या कुशीतच सार जीवन ठेवलं

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर

झोके घेताना इतकं मात्र कळत

देवानं

पोट देऊन स्वावलंबी केलं...!

पाठ देऊन परावलंबी केलं...!

पोटासाठी राब राब राबाव लागत

पाठी साठी मात्र हात पसराव लागत

कारण भरल्या पोटावर हात फिरवता येतो

पण

शाबासकी साठी हात दुसऱ्याचा लागतो

सत्य साधंसुध जेंव्हा

आकलनात येत

तेंव्हा मात्र जीवनाच कौतुक वाटत

आणि

पुन्हा नव्या उमेदीने वाटत

जीवनगाणे गातच रहावे..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action