STORYMIRROR

Sujata Puri

Inspirational

3  

Sujata Puri

Inspirational

जीवनदायिनी

जीवनदायिनी

1 min
190

गाईचा राखतात मान

बाईचा मात्र अपमान

संस्कृती आहे कुठली

मिळतात छळणारे बाण.


सर्वस्व वाहून जीवनाचे

फुलवते संसाराचा मळा

रंग भरते आनंदाचा

पण तिच्याच नशिबी कळा . 


सहन करून सगळे

संसाराचा बनते पाया

झिजून झिजून जगताना

बदलून जाते काया.


जीवनदायिनी सगळ्या विश्वाची

दुर्लक्ष करते स्व- इच्छांना.

गृहसौख्य हेच असते

ठाऊक तीच्या निष्ठांना.


कष्टदायी मानत नाही

आनंदी भाव खरा

तिच्या डोळ्यात असतो

नेहमी वात्सल्याचा झरा.


 स्रीच असते आधार

सगळ्या मानवी समाजाचा

तिच्याच हाती असतो

अधिकार नव निर्माणाचा.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational