जीवनाचे गणित
जीवनाचे गणित
जन्माला येवुनी सुरू झाले
माझे जीवनाचे गणित
सोडवायला गेले एक एक
टप्पा धरुनी आयुष्याची रीत.
नाती-गोत्यांची केली बेरज
सुख समाधान ही मिळवले
केली दुःखाची वजाबाकी
थकाबाजीला काहीच न ठेवले.
घेतला आनंद गुणाकारने
संकटांचा केला भागाकार
बराच वेळ लागून सोडले ते
ताळ लागताच सोडला सुस्कार.
माणुसकी,परोपकार समाज
सेवेची लावली झालर जीवनाला
श्रुसुषा ज्ञान दानाने जोडली मुक्ती
ध्यानाने गोडी लावली आयुष्याला.
शुन्यापासुनी सुरू झालेल्या
आयुष्याच्या गणिताने घेतली
माझी वेळोवेळी छान परिक्षा
मी ही त्यात शाबासकी मिळवली.
