STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

3  

AnjalI Butley

Inspirational

झेप घेण्या

झेप घेण्या

1 min
1.2K

बंधनात पण सुख होते

आयत सर्व मिळत होते

जो तो करत होते लाड

प्रेमाने देत होते खाऊ फार!


लांबुनच पाहत होतो 

ते मोकळे आकाश

पाहात होतो त्या माझ्या बंधूभगिनींना

विहार करत होते छान!


मी बघीतले माझ्याकडे

काय कमी आहेत माझ्यात

नाही काही व्यंग तरी

बंधनात अडकून करतोय आराम?


दिसतोय सर्वात छान

पंखात आहे बळ

तर दे ते झुगारून सारे बंधन

घे भरारी आकाशात मोकळा विहार करण्यासाठी!


भेट तुझ्या खर्या सग्या सोयर्यांना

ओळख तुझी तुला होऊ दे नव्याने

खरी तुझी ताकद तुला भेटू दे

नव वर्ष पूर्वसंधेला!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational