झाशीची राणी लक्ष्मीबाई
झाशीची राणी लक्ष्मीबाई
झाशी राणी लक्ष्मीबाई
माझे थोर श्रध्दास्थान,
कर्तृत्वाने निनादल्या
मम हृदयी अधिष्ठान..!!१!!
मनू स्फुर्तीचा निर्झर
शूर धाडसी करारी,
जिद्दी सौंदर्य सम्राज्ञी
धैर्यवान प्रज्ञा भारी..!!२!!
लेक शोभे पेशव्यांची
वय असूनी लहान,
इंग्रजांशी लढा दिला
क्रांती केली ती महान..!!३!!
मेरी झाशी नही दुंगी
राणी अशी गरजली,
त्यागमूर्ती लक्ष्मी राणी
ब्रिटिशांशी बरसली..!!४!!
बाळ पाठीशी बांधून
जिव्हा थके त्यांचे धैर्य,
किर्ती गाजे त्रिभुवनी
स्त्रिमहिमा त्यांचे शौर्य..!!५!!