क्रांतिकारक
क्रांतिकारक
"दिनांक" शब्दाचे तेजस्वी लेखक
प्रभावी वक्ता, महान नाटककार,
होते जहाल थोर क्रांतिकारक
समाजसुधारक ते इतिहासकार!१!
स्वातंत्र्यवीर सावरकरांची
राष्ट्र प्रेमाची अखंड कुडी,
"काळे पाणी" लिहिले त्यांनी
गाजवली "मारसेलीस" उडी!!२!!
ने मजसी ने परत मातृभूमीला
क्रांतिसूर्य सावरकर हृदयी वदले,
परदेशी मालावर बहिष्कार
स्वातंत्र्यासाठी ते खूप झटले!३!!
स्वातंत्र्याची धगधगती मशाल
जीवन बलिदानाची आहुती,
स्वातंत्र्य लढयातील सुवर्णपान ते
युवकांचे प्रेरणास्त्रोत राष्ट्रभक्ती!४!
स्त्रोत्र गाजले" स्वदेशीचा फटका"
आधुनिक दधिची केला अन्नत्याग,
अत्रेंनी दिली उपाधी स्वातंत्र्यवीर"
सव्वीस फेब्रुवारीस केला देहत्याग!!५!!
