पाऊस... पहिला
पाऊस... पहिला
1 min
223
धुंद पाऊस हा पहिला
अवखळ वारा आला
पावसाच्या अमृतधारा
चातकावरी बरसला....!!१!!
मेघराजाच्या भेटीसाठी
वसुंधरा ही आसुसलेली
पावसाच्या रूपे भेटे तिजला
मेघधार कशी सरसर बरसली....!!२!!
पहिला पाऊस भारी अवखळ
सोसाट्याचा हा सुटला वारा
झाडे झुडपे वेली डोलती
मयुराने फुलविला पिसारा.......!!३!!
पहिला पाऊस रिम् झिम्
मेघ दाटले मी ओली चिंब
मनात दाटून आल्या भावना
पाण्यात पडले सख्या प्रतिबिंब......!!४!!
पहिला पाऊस माझा शब्द सखा
आळविते रे मी मल्हार रागा
धरेने लपेटला हिरवाकंच शालू
मेघ धरेचे मिलन जुळला प्रेम धागा.....!!५!!
पाऊस माऊलीच्या दुग्धापरि
बरसला भूवरी बत्तीस धारांनी
धरणी माता ही शांत जाहली
पसरवला सडा या शुभ्र गारांनी...!!६!!
