क्रांतिकारक मंगल पांडे
क्रांतिकारक मंगल पांडे
महायोध्दा मंगल पांडे
माझे आहेत श्रद्धास्थान,
किती वर्णू त्यांचा पराक्रम
हृदयी त्यांचे असे अधिष्ठान!!१!!
जन्म एकोणीस जुलैला
नगवा नामक शहराला,
मंगल पांडे क्रांती विराचा
उदयास बालिया जिल्ह्याला!!२!!
नगवा गावाचा असे सुपुत्र
अभय राणी त्यांची माताजी,
जन्मा आले दिव्य बालक
दिवाकर शोभती पिताजी!!३!!
स्वातंत्र्य संग्रामाची
क्रांती ज्योत चेतवली,
ईस्ट इंडिया कंपनीत
सैनिक भरती जाहली!!४!!
जन्मा घातला विद्रोह
भारतीयांच्या मना मनात,
स्वातंत्र्य प्राप्तीची ईच्छा
पेटवून संचारली तनातनात!!५!!
मंगल पांडे महान क्रांतिकारी
नवीन रायफल लाँच झाली,
नाव एन फिल्ड पी त्रेपन्न
चरबीची अफवा पसरली!!६!!
गाई डूक्कराची चरबी
हिंदू मुस्लिम मने दुखावली,
भावनांचा उद्रेक धगधगला
मेजर ह्युसनवर गोळी झाडली!!७!!
पांडेला नजर कैदेत ठेवले
ब्रिटिशां विरूध्द बंड पुकारले,
बराकपुर येथे फाशी दिधले
भारतीयांचे रक्त सळसळले!!८!!
जय हिंद
