STORYMIRROR

Amit Jahagirdar

Romance

3  

Amit Jahagirdar

Romance

जगायचं ना ? मग प्रेम करा !

जगायचं ना ? मग प्रेम करा !

1 min
6.4K


जगायचं ना ? मग प्रेम करा !

हात कुणाचा तरी हाती धारा !


तुम्ही वेडे होता

जेव्हा ती येणार असते

किती वेळ वाट पाहतोय

हेही कळणार नसते


तिची वाट पाहत राहता

अगदी तासान तास

ती दिसताच घेता

रोखलेला श्वास


वाट पाहण्यात मजा असते ना ?

गोड गोड सजा असते ना ?


ती दिसताच होतो आनंद खरा

जगायचं ना ? मग प्रेम करा ! ।।१ ।।


तिला बोलवायचं एकदा

बागेत चोरून

बसायचं जवळ तिच्या

हाती हात घेऊन


ती काढेल अभ्यासाचे विषय

आपण व्हायचं फक्त प्रेममय

कुठली एखादी कविता ऐकवा

किंवा गाण्यातली छान लय


बागेत भेटण्यात मजा असते ना ?

डोळ्यांनी बोलण्यात मजा असते ना ?


आणि मनात फुटतो भावनांचा झरा

जगायचं ना ? मग प्रेम करा ! ।।२।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance