STORYMIRROR

Amit Jahagirdar

Others

3  

Amit Jahagirdar

Others

श्रावणाचा अनुभव नवा

श्रावणाचा अनुभव नवा

1 min
107

बाहेर उन्हाचा काहूर

मनात माझ्या पाऊस

न भिजण्याचं तुझे बहाणे

मला चिंब होण्याची हौस


पावसाला बघितले कित्येकदा

मी खिडकीत माझ्या

स्पर्श करून गेला तो कित्येकदा

मनाला निपचित माझ्या


पडण्यास म्हणे त्याला

ढगांची चादर पांघरावी लागते

मनातल्या पावसाला

कास मनाची धरावी लागते


विचार पावसाचे वा तुझे

ओलावा येतो दाटून मग

तू नसलास जवळी कि

आभाळ कोसळते फाटून मग


सोबतीला तू हवा

असू दे मग थंड हवा

बिलगून तुला घेईन मी

श्रावणाचा  अनुभव नवा


Rate this content
Log in