STORYMIRROR

Amit Jahagirdar

Romance

3  

Amit Jahagirdar

Romance

पहिलं प्रेम …

पहिलं प्रेम …

1 min
5.2K


सूर्य मावळायला लागला की

पायांनी तुझी वाट धरणं

बोललीस काहीतरी छान की

अलगद तुझा हात धरणं


आपलंस चंद्राचं चांदणं

हलकेच मनाचं माझ्या

तुझ्याकडे रांगणं


तुझ्या डोळ्यात

खोल खोल गुंतणं

आठवणीत तुझ्या

रात्र रात्र जागण


तुझ्या वाटेत

निपचित पडून राहण

तुझ्या हसण्यावर

मोर पिसासारखं वाहण


तुझ्या आनंदात

बेभान होऊन नाचण

आणि माझ्या दु:खाला तुझं

अश्रूंनी न्हाऊ घालण


दोन थेंब पडताच पावसाचे

तुझी आठवण येण

यालाच म्हणतात ना

कुणावर प्रेम जडण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance