STORYMIRROR

Amit Jahagirdar

Romance

3  

Amit Jahagirdar

Romance

प्रेम कराव बिनधास्त प्रेम

प्रेम कराव बिनधास्त प्रेम

1 min
5.2K

मनातल गाणं धुंद गाव गाणाऱ्यांनी

प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करणाऱ्यांनी।।

ऊन तिरप झेलणाऱ्या गवताच्या वाटेत

किंवा एखाद्या झाडाखाली मोगऱ्याच्या बागेत

तिला समोर ठेवून नुसत बोलायचं डोळ्यांनी ।।

प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करणाऱ्यांनी।।

वाट तिची बघत झाडाखाली झुराव

दिसताच ती, अलगद वाऱ्यावरती उडाव

क्षितीज गाठाव जेव्हा बळ दिल असत स्वप्नांनी ।।

प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करणाऱ्यांनी।।

ती- तिचा चेहरा दिसतो सगळी कडे

मन तेव्हा कस पाखरू होऊन उडे

आकाशाला गाठाव प्रेमाचे पंख लावून उडणाऱ्यांनी||

प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करणाऱ्यांनी।।

पावसाचा थेंब कळतो कुणावर प्रेम केल्यावर

श्रावणही निरस वाटतो तिला मिठीत घेतल्यावर

चातकाच रूप घ्यावं ढग दिसलेत कि भिजणाऱ्यांनी।।

प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करणाऱ्यांनी।।

साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance