जगाला प्रेम अर्पावे
जगाला प्रेम अर्पावे
जगाला प्रेम अर्पावे
करू देशभक्ती सारे
तनमनधन वाटुनीच
गाऊ देशप्रेमाचे नारे
नको राग द्वेष क्रोध
नसावा वर्ण भेदाभेद
देशवासी बंधूभगिनी
नको दंभ गर्व न् खेद
फुलवू प्रेमानेच प्रेम
जागवू मायेची नाती
उखडून टाकूया रुढी
धर्मभेद आणि जाती
देश असे शिवरायांचा
ठेवू सुखद आठवणी
महात्मे अन् थोरांच्या
संचिताच्या साठवणी
जरी आलेय तंत्रज्ञान
स्मरू आईचे संस्कार
साधूसंतांची शिकवण
जीवनाचे ते अलंकार
दाखवू भूतदया सर्वां
नकोच मनी अहंकार
उच्च नीच भेद करता
दाखवूच प्रेमाविष्कार
