Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

जेव्हा पाऊस तुझ्यावर पडतो...

जेव्हा पाऊस तुझ्यावर पडतो...

1 min
231


जेव्हा पाऊस तुझ्यावर पडतो ,

काळया तांबड्या केसातून ठिबकणारा थेंब ,

ओघळत गालात हसत असेल ,

कदाचित तोही म्हणत असेल ,

मी बरसलो नसतो तुझ्यावर तर ,

सांग का ? बरसलो असतो ...

जेव्हा पाऊस तुझ्यावर पडतो ,

अशी चिंब भिजतेस तू पावसात ,

वाऱ्यावर उडणारी ओढणीही तुला लपेटून घेते ,

कदाचित या नितळ कायेला ,

दृष्ट न लागो पावसाची म्हणत ,

वाऱ्याशीही कट्टी करते ...

जेव्हा पाऊस तुझ्यावर पडतो ,

आडोसा ही हाक देतो दुरून ,

नको ग ओली चिंब होऊच अशी ,

पाऊसच तो ना त्याचा भरवसा ,

कदाचित गुज ही त्याच्या मनाची ,

विश्वास ठेव आधार देईल तुजला ,

हा कोरडाच आडोसा ...

जेव्हा पाऊस तुझ्यावर पडतो ,

वाहणाऱ्या लोटात तो वेडा गंध मिसळतो ,

वेडा जीव हा माझा वेडावुन ,

तो तिच्या चेहऱ्यावर पडतो,

ओठातून जेव्हा तू चाखते त्यास ,

गोडवा पाण्याचा गालावर येतो ,

कदाचित हरखुन जातो तो तुझ्या खळीत ,

थेंब गुलाबी दवासारखा तो लखलखतो ...

जेव्हा पाऊस तुझ्यावर पडतो ,

विसरतो तो पाऊस आहे ,

आठवणीत त्या बेभान हरवतो ,

क्षण तो जगण्या साठवून ठेवण्या ,

बरसतो बरसतो आणि बरसतच जातो ,

कदाचित तू पुन्हा त्याला न भेटशील या भीतीने ,,

पुन्हा पुन्हा गरजतो ,

मुसळधार बरसतो ,

मुसळधार बरसतो ...

जेव्हा पाऊस तुझ्यावर पडतो .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance