STORYMIRROR

Jyoti gosavi

Romance

3  

Jyoti gosavi

Romance

जाता जाता पावसाने मागे वळून

जाता जाता पावसाने मागे वळून

1 min
439

जाता जाता पावसाने

मागे वळून पाहिले

हरवलेले गीत त्याचे

तेथेच होते राहिले


ती होती गर्भारशी

नेसली हिरवा शालू

या सुगीत लेकरांना

पोटभर जेवू घालू

याच आशेने त्याने

तिच्याकडे पाहिले

जाता जाता पावसाने

मागे वळून पाहिले


धुंद गंध मृतिकेचा

भरून हृदयी राहिला

टिपे गाळीत नाचताना

मोर येथे ची पाहिला

आसवां साठी त्या पुन्हा

कुतूहलाने पाहिले

जाता जाता पावसाने

मागे वळून पाहिले


भेट आणि विरह व्यथा

 दोन्हीही भाव सोसताना

पाहिले त्यालाच येथे

रात्रंदिन बरसताना

पुनर्भेटीचे वचन घेऊन 

दोघेही उगा राहिले

जाता जाता पावसाने

 मागे वळून पाहिले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance