STORYMIRROR

Manisha Awekar

Romance

3  

Manisha Awekar

Romance

जाण गं भावना!!

जाण गं भावना!!

1 min
235

रंग गंधे कमलिनी

तळ्यामधे उमलल्या

प्रीतभाव उसळला

कधी कळणार तुला!!


ओढ गाढ भरतीची

लाटा वेगे उसळल्या

प्रेमभाव दाटलेला

कधी कळणार तुला!!


गर्द हिरवाई वनी

कळ्या फुले बहरल्या

प्रीतगंध भावलेला

कधी कळणार तुला!!


उंच उंचच पर्वतरांगा

रंग हिरवाई सजलेल्या

प्रीतरंग गंधाळला

कधी कळणार तुला!!


उपवने बहरली

गंध घमघमाटला

प्रिया हवीस साथीला

कधी कळणार तुला!!


भाव दाटले हृदयी

कसे आवरु मनाला!!

भेट राणी झणी मला

कधी कळणार तुला!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance