STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Tragedy

4  

प्रतिभा बोबे

Tragedy

जालीयनवाला बाग हत्याकांड

जालीयनवाला बाग हत्याकांड

1 min
468

१३ एप्रिल १९१९ चा दिन काळा उगवला

जनरल डायर नावाच्या हैवानाच्या अवकृपेने

मार्शल लॉच्या जाचक कायद्यामुळे

जन नव्हते थांबू शकत समुदायाने


अमृतसरमधील जालीयनवाला बागेत

स्त्री-पुरुष,मुले,हिंदू-पंजाबी बांधव जमलै होते

सण साजरा करावया सण आवडता बैसाखीचा

एकमेकाच्या आनंदात सहभागी होण्या आले होते


क्रूरकर्मा जनरल डायर टपून होता घेण्या सूड

नव्हती फिकीर त्याला निष्पाप जिवांची

दिला हुकूम झाडण्या फैरी समूदायावर

जन पळू लागले सैरावैरा तमा त्यांना प्राणाची


झाडल्या १६००फैरी क्रूरपणे त्याने

जीव वाचवण्या विहिरीत टाकल्या उड्या कित्येकांनी

गर्दीत चिरडले गेले शेकडो,चारशे तर गतप्राण झाले

वाहून सुकले होते हजारोंच्या डोळ्यांतील पाणी


हत्याकांडाची होता विचारणा डायरला

वदला बिनदिक्कतपणे बोल निर्दयी

संपल्या फैरी म्हणून वाचले जीव कित्येकांचै

असत्या तर मारले असते आणखी जीव मी


उद्धट डायरच्या कृत्याने पेटून उठले देशभक्त

कित्येक क्रांतिकारकही यातून निपजले

घालवून देण्या जुलमी राजवट इंग्रंजांची

लाखो भारतवासी संघटित झाले


घटनास्थळी जालीयनवाला बागेच्या

१२ वर्षांचे भगतसिंग पहाऱ्यातून निसटून पोहोचले

कुपीत भरुन घेतली माती अन् सांडलेले रक्त

घरी आणून पूजा करून वाहिली फुले


१०० वर्षे झाली या घटनेला आज तरीही

चीड विलक्षण मनात येते दाटून

काय गुन्हा होता हजारों निष्पाप जीवांचा

ज्यांना ह्रदयशून्य डायरने मारले कोंडून


सलाम माझा त्या देशभक्तांना मनापासून आहे

ज्यांच्या बलिदानामुळे आज मी स्वतंत्र भारतात आहे

देशभक्तांपुढे या नतमस्तक मी सदैव आहे

शब्दांतून माझ्या मी त्यांना श्रद्धांजली देत आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy