जाब
जाब
दूर असा जाताना, पाणी दाटले डोळ्यात.
माझ्या आठवणींचा पाऊस, तुझ्या आठवणींच्या उन्हात.
झाल नाही बोलणं, की पाहिले नाही मनभर.
माझ्या घराचीच वाट, आता मला सोडणार.
नसेल जवळ तू आता, क्षण कसे हे जाणार.
तुझ्या पिरतीची आस, उद्या जवळ मी येणार.
तरी पण राहवेना, अस सोडून एकटीला तुला लांब.
काही वेळासाठीच दुरावा, फक्त थोडा वेळ थांब.
बघ येणार तोऱ्यात, मिरवीत माझा बाज.
असा दिसता समोर, कसा चढल ग साज.
मला बघून लाजंल, पाणी थोड मग पाजंल.
पाहता एका कटाक्षाने, हलकं थोडसं हसणं.
एकांत मिळताच थोडा, मला विचारल जाब.
सगळा घेईल हिशोब, जशी लाडाचीच बाब.