ईश्क
ईश्क
श्रीमंती गं तुझ्या इश्काची लाभूनी
कृपादृष्टी आहे सखे तुझी माझ्यावरती
शब्दा शब्दांची उधळण करूनी
नात्याचे नाजूक धागे गुंतले तेव्हा...
पडलो सखे प्रेमात मी तुझ्या
रीत आगळी-वेगळी आहे तुझी
कधी ना ! ती तोडणार मी !
टपोऱ्या डोळ्यात आहे प्रिये
तेजस्वी अशी तुझी प्रतिमा घेऊनी
लढतो आहे जीवनात मी....!
वार तुझ्या इश्काचा हृदयी झेलुनी
रतीब रचला सखे आपल्या इश्कने
गगनाला भिडली आहे, आपली प्रेम कहानी
डर नको गं ठेवू तू आपल्या मनी
चिंतेत डूबता अश्रू येती नयनी
रोखू नको गं नजर तुझ्या इश्काची
लिहितो आहे "मार्शल" कहानी प्रेमाची......!

