STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

हुरहूर लागली मला...

हुरहूर लागली मला...

1 min
303

सरल्या वाटा सार्‍या जगीच्या, सांग कुठे शोधू तुला

शोधतोय सुगंध तुझा, सांग कुठे तू माझ्या फुला

पुन्हा तुला भेटण्याची वेडी ही

हुरहूर लागली मला...


भेटेल का त्या जुन्या वाटेवर, मला पुन्हा तुझी साथ?

विसावेल का माझ्या हाती, एक क्षण तुझा हात?

गुपित एक न सांगितलेले, नजरेने सांगण्या तुला

पुन्हा तुला भेटण्याची वेडी ही

हुरहूर लागली मला...


सांगू तुला प्रेम होत, एका क्षणात साजणी

फक्त त्या क्षणाची आपण, वाट पहावी मनापासूनी

त्याच जुन्या वाटेवर, शोधतोय रोज तुला

पुन्हा तुला भेटण्याची वेडी ही

हुरहूर लागली मला...


जगू वाटती तुझ्यासवे, सायंकाळचे ते क्षण

पाहून तुला सांगतो खरंच, तृप्त होतं माझं मन

पुन्हा एका भेटीची वेळ मागतो तुला

पुन्हा तुला भेटण्याची वेडी ही

हुरहूर लागली मला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance