STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

3  

Sanjana Kamat

Inspirational

हरवून जाते मन (अष्टाक्षरी)

हरवून जाते मन (अष्टाक्षरी)

1 min
354

रत्न उधळे सौंदर्याचे

शुभ्र दुग्ध खळखळे

दृश्य मृग्ध स्वर्गमयी

सृष्टी दातृत्व उधळे

झरे विद्युत गर्जती

नित्य अविष्कार नवा

ऋण बहार फुलवी

झुले प्रितीचा पारवा

धुंद तुषार उधळे

सृष्टी प्रांगण बहरे

झंझावात हिरवाई

दरी डोंगर गहरे

हरवून जाते मन

तन डोले उत्साहाने

ऋतू प्रेमांकूर नाचे

मनी कस्तुरी तराणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational