हरवलेले बालपण
हरवलेले बालपण
बरोबरी जगाची करत , धावत्या जगात मिसळला,
या धावत्या जगात मानव बालपण विसरला !
माणसाने हे धावतं जग विसराव ,
या जगातून परत बालपणात जावं !
जबाबदारीने प्रत्येकाचे बालपण मरते ,
लुप्त झालेल्या बालपणाची फक्त आठवण उरते !
जीवनात बालपण एकदा येतं ,
बालपण आयुष्यात एक वेगळी आठवण देऊन जातं !
आठवणींच्या सागरात खोलवर जावं ,
बालपणीचा आनंद प्रत्येक क्षणी मिळावं !
या आठवणींच्या पावसात असच भिजावं ,
देवाकडे हे वेड बालपण परत मागावं !
आठवणींच्या पावसात प्रत्येकाला भिजू दे ,
नशिबी सर्वांच्या आनंदी बालपणाची आठवण असू दे !
हरवलेलं बालपण एकदा परत यावं ,
जाऊन परत बालपणात ,आनंदी क्षणात भिजावं !
