STORYMIRROR

Bushira Shaikh

Others

2  

Bushira Shaikh

Others

स्पर्धा आयुष्याशी

स्पर्धा आयुष्याशी

1 min
85

नको स्पर्धा मित्र -मैत्रिणींशी ,नको स्पर्धा शेजारच्यांशी ,

जग जिंकायचे असेल तर करूया स्पर्धा आयुष्याशी ! 


स्वत:ला सिद्ध करण्यासाठी भिडावं लागतं जगाशी ,

जगात स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर करूया स्पर्धा आयुष्याशी ! 


सिद्ध करून स्वत:ला यशाची थाप घ्यावी पाठीशी ,

यशाची थाप पाठी घ्यायची असेल तर करूया स्पर्धा आयुष्याशी ! 


आयुष्य जगतांना मैत्री करावी लागते कष्टाशी, 

कष्टाचा अभिमान राखून करूया स्पर्धा आयुष्याशी !


कष्टमय आयुष्य जगत असतांना ओळख होते परिस्थितीशी ,

परिस्थिती वर मात करायची असेल तर करूया स्पर्धा आयुष्याशी ! 


इतिहास घडविलेल्या व्यक्तिंनी प्रेम केले पुस्तकांशी, 

इतिहास घडवत असतांना केली स्पर्धा आयुष्याशी ! 


Rate this content
Log in