होऊ प्रेमाचा चातक...
होऊ प्रेमाचा चातक...
आयुष्याची चार पाने
नकळत सुखावली
सप्तपदी चालून तू
साथ माझी निभावली
ठेच लागता मला गं
डोळा तुझ्या थेंब गळे
सखे तुझ्या अस्तित्वाने
बहरले माझे मळे
भोवताली दाटलेला
अंधार प्रकाश झाला
साजणी तुझ्या साथीने
गं मल्हार बरसला
राग लोभ सारे व्यर्थ
सोबतीचे गीत गाऊ
जात धर्म पंथ नको
समतेचे बीज पेरु
अशी साथ तुझी माझी
मला जन्मोजन्मी हवी
बघ चंद्रही लाजतो
स्तुती ऐकताना तुझी