होळी
होळी
ती होळी स्मरते आजही
तुज मी रंगात रंगविलेली
गुलाल लावून तुजला
नखशिखांत माखविलेली
तू लाजून चूर झालेली
राग खोटा वरकरणी पण
मनात खुश झालेली
ही रंगात रंगली काया
रूप तुझे खूप खुललेले
मन वेडे होऊन माझे
तुझ्यावरी भुललेले

