STORYMIRROR

Urmila More

Romance

3  

Urmila More

Romance

हो.. फरक पडतो तू नसल्याने

हो.. फरक पडतो तू नसल्याने

1 min
309

ते नजरेतले बोलणे चुकल्यासारखे

वाटते तू नसल्याने

भावना शब्दांविना अजाण

वाटू लागते तू नसल्याने

हो.. फरक पडतो तू नसल्याने..

वाट विसरल्यासारखी

वाटते तू नसल्याने

नाही सांगता येत मनातले

सारे तू नसल्याने

हो.. फरक पडतो तू नसल्याने..

विसरते माझी मला

तू नसल्याने

ओळखायला लागते स्वतः पेक्षा

जास्त तुला

तू असल्याने

हो.. फरक पडतो तू नसल्याने 

सांगता येतं तुला मनातले

सारे तू असल्याने

हक्काने रागावते मन माझे

तू असल्याने

म्हणूनच... 

फरक पडतो तू नसल्याने

हो.. फरक पडतो तू नसल्याने



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance