हो मी प्रेमात आहे
हो मी प्रेमात आहे
शिवछत्रपतींच्या, शंभूछत्रपतींच्या।
शिवशाहीच्या, वीर मावळ्यांच्या ।।
हो मी प्रेमात आहे, हो मी प्रेमात आहे ।।धृ।।
विरयोद्धा नामयांच्या, झुंजार चोखोबांच्या।
कर्मयोगी सावत्यांच्या, विद्रोही तुकोबांच्या ।।
हो मी प्रेमात आहे, हो मी प्रेमात आहे ।।१।।
अभंग गाथेच्या, अन ग्रामगीतेच्या।
कबीरांच्या दोह्याच्या, रवीदासी वाणीच्या।।
हो मी प्रेमात आहे, हो मी प्रेमात आहे ।।२।।
अनूभव मंटपाच्या, बसवांच्या वचनाच्या।
चक्रधरी दृष्टांन्ताच्या अन बुद्ध मताच्या।।
हो मी प्रेमात आहे, हो मी प्रेमात आहे ।।३।।
सावित्रीमाई-ज्योतीबांच्या लढ्याच्या।
शाहूं कार्याच्या,भगतसिंग शहिदांच्या।।
हो मी प्रेमात आहे, हो मी प्रेमात आहे ।।४।।
बाबासाहेबांच्या,भारतीय संविधानाच्या ।
प्रस्ताविके मधिल हरएक विधानाच्या ।।
हो मी प्रेमात आहे, हो मी प्रेमात आहे ।।५।।
गाडगे बाबांच्या मनशुद्ध किर्तनाच्या।
राष्ट्रसंतांच्या जनोद्धारी खंजेरीच्या।।
हो मी प्रेमात आहे, हो मी प्रेमात आहे ।।६।।
अखंड बंधुतेच्या, चिर स्वातंत्र्याच्या ।
समतेच्या क्रांतिच्या,समृद्ध भारताच्या।।
हो मी प्रेमात आहे, हो मी प्रेमात आहे ।।७।।
शिवकवि मानवतेच्या नित्य नियमात आहे।
तुकोबांच्या भव्य प्रेरनेच्या आयामात आहे ।।
हो मी प्रेमात आहे, हो मी प्रेमात आहे ।।८।।
