हळूच आसवे ओघळली
हळूच आसवे ओघळली
भारतभूमीच्या पुत्रा
काय उपमा तुला देऊ
भास तुझा छळतो मनोमनी
आठवणींशिवाय घास कसा घेऊ.. 1
देशासाठी लढतोस तू
अभिमान वाटतो मनी
तुझ्यासाठी बाबा बाबा म्हणोनि
चिमुरडी गातिय गाणी.. 2
नाव तुझे शेजारी -पाजारी घेती
आई बाबाच्या नयनी येते पाणी
क्षणात सगळे विसरून जाती
गर्वाने म्हणती तोच आमचा वीर मनी.. 3
जाशी परतोनी प्रियतमा मायभूमीसाठी
दुःख उदरी अस्मित लपवली
तू दूर जाता मनमोहना
हळूच आसवे ओघळली