हे वेडे मन माझे
हे वेडे मन माझे
ही सावली तुझी पिच्छा सोडत नाही
कितीही प्रयत्न केला तरी आसवांना थांबवू शकत नाही
असले कितीहि मन माझे हळवे
चेहऱ्यावर हसू पण मनात मात्र अश्रु
ही वाट आहे मोकळी आसवांना माझ्या जणू
असलेच दूर जरी मन माझे
तुला शोधत होते
विचारांना वाट टू दिली करून मोकळी
वाटते हळूच येऊन भेटावे तुज
सांगावे मनातले सर्व तुझ्या जवळी
पण वाटते भीती माझ्या मनी
ना जावे दूर माझ्यापासून
ही खंत माझ्या मनी लागे
खरेच का असते वेडे मन हे
खरंच का असते वेडे मन हे

