STORYMIRROR

Savita Jadhav

Action Classics

3  

Savita Jadhav

Action Classics

हे जग मला विसरेल

हे जग मला विसरेल

1 min
187

हे जग मला विसरेल..

पण नाही विसरणार माझे कर्म

हेच तर आहे माणसाच्या

जीवन जगण्यातले खरे मर्म


हे जग मला विसरेल..

पण विसरणार नाही माझं व्यक्त होणं,

जे स्पष्टपणे मांडते लेखणीतून

लक्षात ठेवतील माझं परखडपणे लिहणं


हे जग मला विसरेल..

पण विसरणार नाहीत माझ्या कवितेच अस्तित्व,

कारण नक्कीच भुरळ पाडेल 

प्रेरणादायी ठरेल समाजासाठी माझं कवित्व


हे जग मला विसरेल..

पण मी जिवंत राहशील माझ्या कवितेमुळे,

कायम राहतील स्मरनात साहित्याच्या जगात

माझ्या विचारांची अन माझ्या काव्याची शब्दफुले

माझ्या विचारांची अन माझ्या काव्याची शब्दफुले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action