हास्य
हास्य
हास्य तुझे पाहता सजना,
मन हे माझे बोलते,
हास्य तुझे पाहता,
मन माझे ओलावते //1//
हास्य तुझे पाहता सजना,
माझी न मी राहते,
हास्य तुझे पाहता सजना,
मन हे माझे हेलावते //2//
हास्य तुझे पाहता सजना,
वाऱ्यासवे ते डोलते,
हास्य तुझे पाहता सजना,
प्रीतीचे गाणे गाते //3//
सांगुन गुजगोष्टी ते,
काहीतरी समजावते,
हास्य तुझे पाहता सजना,
मन हे माझे हेलावते //4 //
शब्द सुमने अपुरे पड़ती,
तुझ्याच हास्यावर मोहरती,
हास्य तुझे पाहता सजना
मन हे माझे ओलावते //5//