STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy

3  

Umakant Kale

Tragedy

हाक

हाक

1 min
354

थकलेल्या या हाताने

येथे थाटले दुकान...

हस्तकला बहारूण

रस्त्यावर हे दुकान !!


झगमगाटीत गुंग

लोक झाली आज दगं !!

फाशनेबलची राग

जणू झाले त्याचे अंग..!!


नाही मातीला रे येथे

गरीबांच्या आज भाव..

विदेशीचे आकर्षण

दामभारी देई भाव...


माझ्याकडे खरेदीला

करे लोक मोलभाव..

कंपनीच्या लेबलची

कधी विचारले दाव ?


वाटे आम्हाला आजही

दोन पैसे रे मिळावे !!

नाही ताकद आमची

कसे विदेशी थांबावे !!


बघा करून विचार

करु आम्ही सणवार..

दोन पैसे पोटाला रे

मग होई कमी भार...


दिवाळीत दुकानात

भाऊ तुम्ही ही "पधारो"

स्वदेशीचा ठेवा मान

गरीबांना ही उद्धारो..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy