हाच तो चंद्र..!
हाच तो चंद्र..!
हाच तो चंद्र....!
हाच तो चंद्र
ज्याने कित्येक लोकांना वेड लावलं
नको नको त्या कल्पना करून
उगाचच भेंडावून सोडलं...
स्वयंप्रकाशित नाही तरी
याचा तोरा केवढा मोठा
शीतल शीतल म्हणून नावाजून घ्यायचं
आणि अनेकांना प्रेमभंगाच दुःख द्यायचं..
आता दिवस बदलले
कोणी उपमेसाठी सुद्धा विचारत नाही
की तोडून आणतो पण म्हणत नाही
साधा नजरकटाक्ष ही पडत नाही...
जरी कोणी चुकून
याचा वापर केला तर संपलेच
आणि करपल्या तव्या सारखे रूप
म्हणून हाती लगेच फोटो आलेच...
आज पौर्णिमा
पूर्वी मन भरून यायचे
कुतूहल वाटायचे
आठवणीने पाणी दाटून यायचे....
पण आता कीव करावी वाटते
काय म्हणून याला इतके महत्व द्यायचे..?
याने तर चक्क फसवले
अनेकांच्या ऋणानुबंधाचे धागे उसवले...!
असू देत मग याच्या पोटी काही ही
याचे मोल मला वाटत नाही
प्रत्यक्ष प्रमाणाने खात्री पटता
अप्रुप सुद्धा काहीच उरले नाही...
म्हणून वाटते हाच तो चंद्र
खरा गुन्हेगार
ज्याने वर्षानुवर्षे केले
अनेकांना बेजार,अनेकांना बेजार...
