STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

2  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

गुन्हा झाला (गझल)

गुन्हा झाला (गझल)

1 min
48

मौन मी पाळले गुन्हा झाला

घाव मी सोसले गुन्हा झाला

बोलबाला सदा असत्याचा

सत्य मी मांडले गुन्हा झाला

का मला तू दिला दगा साकी

प्रेम मी वाटले गुन्हा झाला

काय होत्या चुका गुलाबाच्या

कंटका पोसले गुन्हा झाला

पावसा पावसा कुठे गेला

शेत मी पेरले गुन्हा झाला

आज मोठे शहर सुने वाटे

गाव मी सोडले गुन्हा झाला

खूप मी भांडलो हवेसाठी

श्वास मी घेतले गुन्हा झाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy