गुलमोहर
गुलमोहर
हिरव्या शालू वरती लाल फुलांची वेलबुट्टी
बहरला हा गुलमोहर मोहरली सारी सृष्टी
रणरणत्या उन्हात उजाड माळरानावर देखील
कला ही संकटांना सामोरे जाण्याची
वसंताची पानगळ आणि रिमझिम मृगाच्या पावसाची
व्यथा ही वेदनेला झुगारून वसंतफुलोरा फुलविण्याची
गुलमोहरा वाटे मज तुझे अप्रुप फार
रणरणत्या उन्हात देखील येतो रंगास तुझ्या निखार
ताप उन्हाचा सोसून स्वतः
सर्वांसाठी शीतल छायेचा होतो आधार
आवडेल मलाही गुलमोहरा तुझ्यासारखं जगायला
पानगळ(सुख दुःखात) सुरू असतानाही मनसोक्त बहरायला ..
