STORYMIRROR

Shila Ambhure

Tragedy

4  

Shila Ambhure

Tragedy

गुलाम व्यसनाचा

गुलाम व्यसनाचा

1 min
413

 

(मुक्तछंद)


शेजारीच राहायचा तो

माझ्या घराच्या

पेपर वाचित बसायचा

सावलीत छपराच्या.

राहणं टापटीप

पायांमध्ये असायचा बूट

ऑफिसात जायचा

घालून टाय आणि सूट

उंचापुरा ,धिप्पाड,गोरा

पडावं कुणीही प्रेमात

असाच तो छोरा

एक दिवस पाहिलं मी त्याला 

रस्त्यावर झुलताना

ठेचकाळत चालत होता तो

कितींदा पडला स्वतः ला सावरताना

आता हे रोजचेच झाले

बाटलीपायी भांडणही आले

सवय आता फारच वाढली

बाहेरची 'ती' आता घरात आली.

व्यसनाने त्याला घेरलं

फुप्फुसाच्या आजरांनी

त्याला हेरलं.

गमवावी लागली नोकरी

अन् देईना कोणी छोकरी

बरेच दिवस लोटले

पण तो अंगणात दिसलाच नाही

आतून आवाज यायचे

मात्र काहीबाही.

वृद्ध आईबाप निराश खुप झाले

का हे व्यसन नशिबी आले?

एक दिवस सकाळीच 

त्याच्या अंगणात गर्दी झाली

'पिऊनच मेला तो'

कुजबुज अशी कानी आली.

न राहवून मीही गेले अंत्यदर्शनाला

उरला होता हाडांचा सापळा

मांस नव्हते जराही शरीराला.

सूटाबूटात पाहायची त्याला

कित्येक दिवसांची सवय होती मला.

पण आज असा किडमिडित पाहून

तिथुन निघाले मी डोळ्यांत पाणी घेऊन.

आई त्याची मोठ्याने रडत होती

टाहो फोडून उर बडवत होती.

बाप बसला होता 

सून्न आणि शांत

जणू त्याला नव्हती 

कसलीच भ्रांत.

जमावाने कांगावा केला

'दारु पिऊन हा गेला. 

शिकलेला असूनही

गुलाम झाला व्यसनाचा.

आहारी गेला दारुच्या अन्

अंत करून घेतला जीवनाचा.

अंत करून घेतला जीवनाचा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

   एक रचना माझी

  शीला अंभुरे बिनगे

      (साद)

   परतुर ,जालना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy