STORYMIRROR

Sant Tukaram

Classics Inspirational

0  

Sant Tukaram

Classics Inspirational

गरुडाचें वारिकें कासे पीतांबर

गरुडाचें वारिकें कासे पीतांबर

1 min
547


गरुडाचें वारिकें कासे पीतांबर ।

सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥


बरवया बरवंटा घनमेघ सांवळा ।

वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥


मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ ।

कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥


ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ ।

वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥


उद्धव अक्रूर उभे दोहींकडे ।

वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥


तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा ।

तो चि माझा सखा पांडुरंग ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics