गर्जा महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा …
ताकद सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांची
संकल्पना शिवबाच्या गनिमीकाव्याची
मातीची महती ह्या महाराष्ट्राची
ताकद समग्र इतिहास घडवण्याची
घडवले जिजाऊने,घडला शिवबा
लढला शंभू , लढला मावळा
रांगड्या मातीत ह्या महाराष्ट्राच्या
भगव्याने न भूतो न भविष्यति इतिहास घडवला
हर हर महादेव,जय भवानी,जय शिवाजी,
नाद अजूनही घुम-घुमतो
कडेकपाऱ्यांत ह्या सहाद्रीच्या
अनादकाली अेकच घोष पुकारतो
झाडे,पाने,फुले,पशु-पक्षी
माळोरानी अेकच-अेक घोष होतो
दगडधोंडे अन् गडकोट-किल्यांचे
आजही रोम अन् रोम शहारतो ….
जय जय महाराष्ट्र माझा …
अेकच जयघोष आसमंती अुठतो
गर्जा महाराष्ट्र माझा …
सळसळत्या धमन्यांतले रक्त घुसळवतो
जय जय महाराष्ट्र माझा …
गर्जा महाराष्ट्र माझा…
