ओढ पावसाची …
ओढ पावसाची …
सगळंचं कसं शांत…शांत
नीळ निरभ्र आभाळ…
हिरवी शामलं नदी …अन्
शांत सफेद निळसर होड्या ..सारे
आपल्याच नीळ्याशार गर्तेत रमलेले
आपल्याच धुंदीत ..मात्र आतून अशांत
वाट पहतात सगळे .. ती वेळ येण्याची
शांत आभाळ ,त्यालाही दाटून आलयं
वाट पहातय…बेधुंद बरसण्याची
शीतल नदी ,तीलाही अुचंबळून आलाय
अधीर झालेय ..तुडुंब वहाण्यासाठी
स्तब्ध होड्या , त्यानांही भरून आलयं
अुत्सुक आहेत ..मनसोक्त विहरण्यासाठी
सगळं कसं शांत…मात्र तरीही अशांत

