STORYMIRROR

Nilesh Bhopatrao

Romance

3  

Nilesh Bhopatrao

Romance

धरेला स्वप्नं आभाळाची

धरेला स्वप्नं आभाळाची

1 min
203

प्रीत जडली सखीला 

निळ्यासावळ्या हरीशी ....


मग धरेलाही स्वप्न पडू लागली 

त्या अथांग निळ्याभोर आभाळाची 

थांग नाही कधी लागला ...


सखीला भगवंताच्या 

अगाध त्या निरमोही मनाचा ..


त्याच भावना पण अव्यक्त ...

धरेसाठी अथांग गुढ अवकाशाच्या आकाशाचे बीज अुमलते

गर्भार त्या धरेच्या पोटी ..


ध्यास असे तीजही मिठीतघेण्या 

आकाशाच्या त्या अथांगतेसही 

क्षितिजावरी होती त्यांच्या गाठी भेटी 

अगणित ती फुले मग ..


नव्याने धरेच्या मनी अुमलती ...

हृदयांतील प्रेमगीत ते ..

स्वरांशिवाय धरेच्या ओठी गुणगुणती ....


प्रीत जडली सखीला 

निळ्यासावळ्या हरीशी ....


मग धरेलाही स्वप्न पडू लागली 

त्या अथांग निळ्याभोर आभाळाची



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance