STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

2  

Jyoti Jaldewar

Classics

गोविंयेंलें देवें आम्हांसी

गोविंयेंलें देवें आम्हांसी

1 min
13.8K


गोविंयेंलें देवें आम्हांसी अभिमानें ।

नामरुप पेणें अंतरलों ॥१॥

करिती विचार इंद्रादी देव ।

हें सुखवैभव न मिळे आम्हां ॥२॥

शेष उष्टावळी मिळतां आम्हांसी ।

पावन जन्मासी होऊं आम्ही ॥३॥

ऐसा विचार करुनियां देव ।

मत्स्यरुप सर्व धरिताती ॥४॥

गोपाळासी सांगे वैकुंठीचा रावो ।

आजी नवलावो तुम्ही करा ॥५॥

कवळ खाउनी हात टिरी पुसा ।

यमुनें सहसा जाऊं नका ॥६॥

कां तो सांगे हरी न कळे तयासीं ।

एका जनार्दनासी गुज पुसे ॥७॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics