गझल
गझल


वृत्त आनंदकंद
गागालगा लगागा गागालगा लगागा
का जीव सांग माझा.. भुलतो तुझ्यात आहे
रमतो तुझ्यात आहे.. जगतो तुझ्यात आहे
संगत तुझी असावी, जिवनात आज वाटे
हा भास होय माझा.. रमतो तुझ्यात आहे
आकाश आज सारे.. भरले जणू ढगाने
जगण्यात सौख्य आता.. बघतो तुझ्यात आहे
स्पर्धा अशी मनाची.. जिवनात आज वाटे
मागे वळून बघता.. हरतो तुझ्यात आहे
प्रेमात मी बुडालो.. सांगू असे कुणाला
नाही कळे मनाला.. मरतो तुझ्यात आहे
श्वासात तूच आहे, जगण्यात तूच आहे
आगीत आज जळुनी, उरतो तुझ्यात आहे
वेड्या नकोस तोडू, विश्वास जीवनाचा
मी जिंकलोय कारण, हरलो तुझ्यात आहे